अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :- श्रीरामपूर शहरातील निरीक्षण गृहातून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
शहरातील वार्ड नंबर ३ मधील निरीक्षण गृहामध्ये हा अल्पवयीन मुलगा राहत होता.परंतु कोणीतरी अज्ञात आरोपीने या अल्पवयीन मुलाला निरीक्षण गृहातील पालकांच्या कायदेशीर रखवालीतून पळवून नेल्याची
तक्रार निरीक्षण गृहाचे केअरटेकर श्री. नवनाथ विनायक बर्डे ( वय 43 ,राहणार – थत्ते मैदान,श्रीरामपूर) यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.
त्यानुसार श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाला कोणत्या कारणासाठी व कशासाठी पळवून नेले ?
याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे करीत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम