अहमदनगर Live24 टीम, 26 जुलै 2021 :- कुकडी प्रकल्पात गेल्या वर्षी ६ हजार ५१० एमसीएफटी (२१ टक्के) उपयुक्त पाणीसाठा यंदा १२ हजार २३६ एमसीएफटी (४१ टक्के) आहे. यामध्ये डिंभे धरणात सर्वाधिक पाणीसाठा आहे. दरम्यान कुकडी प्रकल्पातील पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला.
त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत २५ जुलैअखेर दुप्पट म्हणजे ४१ टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. कुकडी नदीवरील येडगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २३१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. १ हजार १२३ एमसीएफटी (५८ टक्के) इतके पाणी आले आहे.
सध्या पाऊस कमी झाला आहे. १० हजार ५०० एमसीएफटी क्षमतेच्या माणिकडोह धरणात ३ हजार ०७५ एमसीएफटी (३० टक्के) पाणी आले आहे. पाणलोट क्षेत्रात ४३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
वडज धरणातून ५४३ एमसीएफटी (४६ टक्के) इतके पाणी आले आहे. घोड नदीवरील डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला. धरणात ७ हजार ४९६ एमसीएफटी (६० टक्के) इतके पाणी आले आहे. पुष्पावती नदीवरील पिंपळगाव जोगे धरणात २२५ एमसीएफटी (६ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.
पाणलोट क्षेत्रात ४४९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. विसापूर तलावात ९ टक्के, सीना धरणात २९ टक्के, खैरी १० टक्के इतके पाणी आहे. ही धरणे परतीच्या पावसानंतर भरण्याची शक्यता आहे.
तर घोड धरणात १ हजार १५ एमसीएफटी (२४ टक्के) पाणी आले आहे. पाणलोट क्षेत्रात २५९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. डिंभे धरण भरले की, घोड धरण भरण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम