रस्त्यात खड्डा कि खड्ड्यात रस्ता… संतप्त तरुणांचे गांधीगिरी आंदोलन

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 26 जुलै 2021 :- सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यातच शेवगाव तालुक्यातील बोधेगाव बसथांब्याजवळ खड्डे पडून रस्त्याची दुरवस्था झाल्याने मोठ्या प्रमाणात चिखल पसरला आहे.

याचा निषेध नोंदवत सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आणण्यासाठी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांत वृक्षारोपण करण्यात आले. बोधेगाव रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत.

परिणामी दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना आपले वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. अचानक आलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे अनेक दुचाकी वाहनांचा अपघात झाला असल्याच्या घटनादेखील घडल्या आहेत.

तसेच गेल्या अनेक वर्षांपासून बोधेगाव बसथांबा रस्त्याचा प्रश्न रेंगाळत पडला आहे. या रस्त्याच्या संदर्भात अनेकदा निवेदने देण्यात आली आहेत. रस्त्याचा प्रश्न गंभीर झालेला असताना अनेक अपघात होऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून डोळेझाक होत आहे.

मात्र बांधकाम विभाग दखल घेत नसल्याने परिसरातील नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. रस्त्याची मलमपट्टी न करता येत्या आठ दिवसांत चांगल्या पद्धतीने हे खड्डे न बुजविल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe