अश्लील चित्रपटाच्या त्या स्क्रिप्ट पोलिसांची हाती!

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 26 जुलै 2021 :- अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई सुरुच आहे. याप्रकरणी आता अनेक नवनवीन माहिती समोर येऊ लागली आहे.

मुंबई गुन्हे शाखेने शनिवारी या प्रकरणात अटकेत असलेला उद्योगपती राज कुंद्राच्या व्हियान आणि जेएल स्ट्रीम अ‍ॅप कार्यालयावर छापे टाकले होते.

यावेळी पोलिसांनी कार्यालयातील अनेक स्क्रिप्ट जप्त केल्या. पोलिसांना ज्या स्क्रिप्ट मिळाल्या आहेत त्याच्या आधारावर अश्लील चित्रपटांचे चित्रिकरण केलं जाणार होतं, अशीही माहिती समोर आली आहे.

मुंबई गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, स्क्रिप्टची लिपी हिदींमध्ये आहे. जवळपास सर्वच स्क्रिप्ट हिंदीत होत्या. त्या स्क्रिप्ट वाचल्यानंतर पुन्हा पॉर्न चित्रपट बनवण्याची तयारी केली जात होती. पण राज कुंद्राला बेड्या ठोकल्यानंतर सर्व स्क्रिप्ट ऑफिसमध्ये लपवून ठेवण्यात आल्या होत्या.

या प्रकरणात प्रॉपर्टी सेलने केलेल्या तपासात महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. अश्लील चित्रपट निर्मिती रॅकेट नेमकं कसं चालायचं, याबाबतची माहिती राज कुंद्राच्या कार्यालयात काम करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांनी प्रॉपर्टी सेलच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. त्यामुळे राज कुंद्राच्या अडचणी पुन्हा वाढणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!