अहमदनगर Live24 टीम, 26 जुलै 2021 :- मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील विविध ठिकाणी बिबट्यासह अन्य वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात अनेक पाळीव जनावरांसह नागिरकांचा बळी पडत आहेत.
नेवासा तालुक्यातील घोगरगाव परिसरात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच असून बिबट्याने एका गोऱ्ह्याचा फडशा पाडल्याने घोगरगाव परिसरातील शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
घोगरगाव येथील अर्जुन थोरात यांच्या वस्तीवर काल रात्री बिबट्याने एका गोऱ्ह्यावर हल्ला करून त्याचा फाडशा पाडला.
या बिबट्याने व त्याच्या दोन बछाड्यांनी या गोऱ्ह्याला जवळ असलेल्या उसात नेऊन फडशा पाडला. यापूर्वीही घोगरगाव येथील रावसाहेब बहिरट यांची शेळी, जालिंदर बहिरट यांची शेळी व दत्तात्रय बहिरट यांचा बोकड बिबट्याने फस्त केलेला आहे.
त्यामुळे बिबट्याच्या धुमाकुळामुळे घोगरगाव परिसरातील शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरलेले आहे. वनविभागाने तातडीने या परिसरात पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करावे,
अन्यथा टाकळीभान येथे श्रीरामपूर- नेवासा महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम