अहमदनगर Live24 टीम, 26 जुलै 2021 :- स्त्री असो की पुरुष कुणालाच म्हातारे होणे आवडत नाही. वाढते वय लपविण्यासाठी म्हणजेच तरुण दिसण्यासाठी त्याची नेहमी धडपड सुरु असते.
त्यासाठी तो मिळतील ते सौंदर्य प्रसाधनांचा वापर करुन चेहऱ्यावरील सुरकुत्या लपविण्याचा प्रयत्न करतो. मात्र मिळते ती निराशाच. सौंदर्य प्रसाधनांऐवजी काही घरगुती उपाय केल्यास आपल्या त्वचा चिरतरुण राहण्यास मदत होईल.
१) व्हिटॅमिन डी घेणे :- व्हिटॅमिन डी आपल्या शरीरासाठी आवश्यक असतं. सूर्याच्या किरणांपासून आपल्याला ते मिळते. जमल्यास सकाळी कोवळ्या उन्हात बसावे त्या पासून आपल्याला व्हिटॅमिन मिळते.
२) संतुलित व पौष्टिक आहार :- आपल्या आहारात नेहमी हिरवा भाजीपाला, ऋतूमानानुसार फळे तसेच दूधाचा समावेश असू द्या. यामुळे आपल्या शरीराला उर्जा मिळून त्वचेला पोषणही मिळते.
३) प्राणायाम :- दररोज सकाळी प्राणायाम करावे. जेणे करून आपले फुफ्फुस उत्तमरीत्या कार्य करेल. श्वसन तंत्र चांगले काम करतील. हृदय स्वस्थ राहील.
४) ध्यानधारणा:- मेडिटेशन करून आपण आपल्या शरीरास तेजवान आणि निरोगी ठेऊ शकतो. मेडिटेशन कामाच्या ताणाला कमी करते.
5) नियमित व्यायाम करावा :- नियमाने व्यायाम करत असल्यास आपल्या आहाराकडे लक्ष द्या. जेवणात प्रथिनांचा समावेश करा. दूध, बदाम, चणे खावे. व्यायामानंतर चणे खावे. ह्यात भरपूर प्रमाणात प्रथिन असतात. जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे.
६) मूग डाळ :- चेहऱ्याच्या त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी विटॅमिन इ अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. त्यासाठी सकाळी भिजवलेली मूग डाळी चावून खा. यामध्ये विटामिन इ जास्त प्रमाणात असते. याचे नियमित सेवन केल्याने तुम्ही बरेच वर्ष तरुण राहू शकताय.
७) रनिंग :- काही लोक आपल्या शरीराला फिट ठेवण्यासाठी व्यायाम करतात, जॉगिंगला जातात. पण काही कारणास्तव वेळ मिळत नसल्यास जेव्हा वेळ मिळेल स्वतःच्या जागेवरच धावावे. धावल्याने रक्त विसरण चांगले होते आणि शरीर निरोगी राहत.
८) गुलाब पाणी :- गुलाब पाण्यासोबत २-३ थेंब ग्लिसरीन, १-२ चमचे लिंबाचा रस मिसळून झोपण्याच्या अगोदर चेहऱ्याला लावा. असे केल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम