प्रेमासाठी काय पण सुनेच्या प्रेमात दिवाना झाला सासरा; पोराला समजल्यावर …

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 26 जुलै 2021 :- प्रेमासाठी काय पण… असे किस्से नेहमीच ऐकायला मिळतात. मात्र, बिहारमध्ये एक अजबच प्रकार घडला आहे. सुनेच्या प्रेमात दिवाना झाला सासरा.

लफडं पोराला समजल्यावर काय केलं हे त्याचं त्यालाही कळेना. त्यांच असं हे झेंटाग बघून पोलिसही गांगरले. आरोपी सासऱ्याचे आपल्या सुनेशी प्रेम संबध होते.

त्याचा २२ वर्षीय मुलगा गुजरातमध्ये नोकरी करत होता. मुलगा जास्तीत जास्त दिवस घरातून दूर राहत असल्याने सासऱ्याचे सूनेसोबत प्रेम संबध जुळले.

मुलाला बायको आणु पित्याच्या या अनैतिक संबधाची कुणकुण लागली. घरी परतल्यावर त्याने दोघांना याचा जाब विचारला.

यावरुन बाप आणि लेकामध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भाडणादरम्यान पित्याने मुलाचा गळा दाबून त्याची हत्या केली आणि प्रेमातील अडसर ठरत असलेल्या मुलाचा काटा काढला. मुलाची हत्या केल्यानंतर मृतदेह बागेत लपवून ठेवला.

आपला गुन्हा लपवण्यासाठी त्याने पोलिसात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रारही दिली. मात्र, अखेरीस पोलिस तपासात प्रेमात वेडा झालेल्या या सासऱ्याचा कारनामा समोर आला. पोलिसांनी मुलाच्या हत्येप्रकरणी त्याला अटक केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News