जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना वास्तुशास्त्र, आर्किटेक्टचर क्षेत्रात करिअरची संधी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :-  वास्तुशास्त्र/आर्किटेक्ट क्षेत्रात अहमदनगर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना करिअर घडवण्याची सुवर्णसंधी आता अहमदनगर शहरात उपलब्ध झाली. ‘रमेश फिरोदिया एज्युकेशनल ट्रस्ट’ च्या वतीने वाळूंज अहमदनगर येथे ‘रमेश फिरोदिया कॉलेज ऑफ आर्किटेक्चर’ जून २०१७ पासून सुरू करण्यात आले आहे.

या कॉलेजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आर्किटेक्चर क्षेत्रातील पदवी अभ्यासक्रम (बॅचलर ऑफ आर्किटेक्चर) पूर्ण करण्याची संधी नगर व परिसरातील व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली आहे. बॅचलर ऑफ आर्किटेक्चर पदवी प्रवेशासाठी ‘कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर’ यांच्या मार्फत नॅशनल अॅप्टीट्यूड टेस्ट फॉर आर्किटेक्ट (नाटा) ही प्रवेश परीक्षा घेतली जाते.

२०२१ आर्किटेक्चरला अडमिशन घेण्यासाठी ही परीक्षा पास असणे आता सक्तीच झाले. सन २०२१-२२ या वर्षातील परीक्षा ऑनलाइन पद्धतीने तिसऱ्यांदा होणार असून परीक्षेची तारीख ३ सप्टेंबर २०२१ रोजी ठरवलेली आहे. २०२१ मध्ये ज्यांनी नाटा ही परीक्षा दोन वेळा दिली. त्यांना तिसरी परीक्षा देता येणार नाही.

परंतु ज्यानी फक्त एक परीक्षा दिली आहे, ते या टेस्टसाठी पात्र आहेत. नाटा विषयी अधिक माहिती व ऑनलाइन अर्ज www.nata.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत.

या परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या व आर्किटेक्टर क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘रमेश फिरोदिया एज्युकेशनल ट्रस्ट’ मार्फत मोफत मार्गदर्शनाची सोय उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे व्यवस्थापकीय विश्वस्त रमेश फिरोदिया यांनी सांगितले. याबाबत अधिक माहितीसाठी ‘रमेश फिरोदिया एज्युकेशनल ट्रस्टचे प्रकाश सोनार यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe