जाणून घ्या जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :-  मुळा आणि भंडारदरा पाणलोटात अधूनमधून जोरदार सरी कोसळत असल्याने दोन्ही धरणांमध्ये पाण्याची आवक सुरू आहे. अपेक्षेप्रमाणे काल पहाटेच मुळा धरणातील पाणीसाठा निम्मा झाला होता.

त्यानंतर 4892 क्युसेकने आवक सुरू असल्याने सायकाळी पाणीसाठा 13111 दलघफू झाला होता.

तर भंडारदरा धरणातही पाण्याची आवक सुरू असलीतरी ती कमी असल्याने हे धरण 70 टक्के भरले आहे. भंडारदरा परिसरात पाऊस होत असल्याने वाकीचा ओव्हरफ्लो व अन्य पाणी निळवंडेत जमा होत आहे.

त्यामुळे काल सकाळी या धरणातील पाणीसाठा 2355 दलघफू (28.31) टक्के होता. या धरणातील पाणीसाठा आज 30 टक्क्यांवर जाणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe