अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :- बिबट्याने शेळीवर हल्ला करून उसाच्या शेतात ओढत नेऊन फस्त केल्याची घटना राहता तालुक्यातील बाभळेश्वर येथील खोबरे वस्तीवर घडली.
याबाबतची माहिती अशी की राहता तालुक्यातील बाभळेश्वर गावामधील शेतकरी दिलीप खोबरे यांची शेळी बिबट्याने रात्रीच्या वेळी हल्ला करून ओढत नेऊन ऊसाच्या शेतात फस्त केली असून
यामुळे बाभळेश्वर येथील खोबरे वस्ती येथे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी वनविभागाकडे केली आहे
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम