अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- गादी कारखान्यास आग लागून मोठी वित्तहानी झाली. ही घटना श्रीरामपूर शहरातील कर्मवीर चौकात घडली. याबाबत अधिक माहिती अशी, शहरातील कर्मवीर चौक परिसरात मुसा मन्सुरी यांचे आराम गादी टेंट नावाचे गादी सेंटर आहे.
याठिकाणी गाद्यांबरोबर मंडपाचेही सामान आहे. पुढे दुकान आणि मागे गोडाऊन आहे. सुमारास शॉर्टसर्किटमुळे या दुकानाला आग लागली. धूर निघत असल्यामुळे ही गोष्ट परिसरातील नागरिकांच्या लक्षात आली.
त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर लोक जमा झाले. तातडीने अग्नीशामक दलाला बोलाविण्यात आले.अग्नीशामक दलाच्या जवानांनी अथक परिश्रम करून आग विझविण्यात आली.
याठिकाणी लागलेल्या आगीमुळे निघत असलेला धूर इतका मोठा होता, की परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम