अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- कोपरगाव शहरासह तालुक्याला गोदावरी नदी वर्षानुवर्षे वरदान ठरत आहे. या नदीमुळे कोपरगाव शहर व तालुक्यातील नदीकाठच्या गावांना समृद्ध केले आहे.मात्र पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास कोपरगाव शहरातील नदीकाठच्या उपनगरांना तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांना मोठा फटका बसतो.
हजारो कुटुंबाना पूरपरिस्थितीत सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे लागते. गोदावरी नदीचा उगम हा नाशिक जिल्ह्यातून होतो. या नदीला येणारे पाणी हे नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून येते. हे सर्व पाणी नांदूरमध्यमेश्वर धरणात एकत्र होते, त्यानंतर गोदावरीत पाणी सोडले जाते.

पावसाळ्यात गोदावरी नदी वाहती राहिल्यास परिसरातील शेती समृद्ध होते. मात्र, अतिवृष्टी झाल्यास नदीला आलेल्या पुरामुळे रुद्रावतार धारण केल्याने नदीकाठच्या परिसराची दाणादाण होऊन नागरिकांची चांगलीच धावपळ होते. प्रसंगी धोकादेखील निर्माण होतो. हजारो कुटुंबाना पूरपरिस्थितीत सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे लागते. मागील दहा- बारा वर्षात अशी परिस्थिती चार ते पाच वेळा उद्भवली होती.
दोन वर्षापूर्वी ऑगस्ट २०१९ मध्येदेखील गोदावरी नदीला पूर आल्याने चांगलीच दाणादाण झाली होती. त्यावेळी प्रशासनातील सर्वच विभागांच्या अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची तसेच स्वयंसेवी संस्था तसेच सयंस्वेकांची चांगलीच दमछाक झाली होती. पूरपरिस्थितीचा सर्वाधिक धोका या गावांना कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपूर, धारणगाव, वडगाव, बक्तरपुर, चासनळी, मोर्वीस, मळेगावथडी,
हिंगणी, सांगवी भुसार, कुंभारी, मायगाव देवी, माहेगाव देशमुख, जेउरकुंभारी, जेऊर पाटोदा, डाउच खुर्द, डाउच बुद्रूक, संवत्सर, मनाई वस्ती, कोकमठाण, सडे, वारी, शिंगवे, पुणतांबा, रस्तापूर, बोरबने वस्ती, बनकर वस्ती, कातनाला परिसरातील हजारो घरात गोदावरी नदीचे पाणी शिरते. त्यामुळे येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे लागते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम