2 फूट उंची असलेल्या सलमानच्या ‘या’ प्रतिनिधीला मिळाली 6 फूट उंच परीसारखी नववधू

Published on -
दुबई : सोशल मीडियावर सध्या पाकिस्तानातील एका बुटक्या नवरदेवाचा विवाह चर्चेचा विषय बनला आहे. दोन फूट उंचीच्या या वराला सहा फूट उंचीची परीसारखी जोडीदार मिळाली आहे. 
या अनोख्या व शानदार विवाहाचा एक व्हिडीयो वेगाने व्हायरल होत आहे. बुऱ्हान चिश्ती असे या वराचे नाव असून त्याने हल्लीच फौजिया नामक तरुणीसोबत प्रेमविवाह केला.
नॉर्वेची राजधानी ऑस्लोमध्ये मोठ्या धूमधडाक्यात त्यांचा विवाह पार पडला. १३ देशांतील लोकांची या विवाहाला उपस्थिती होती. बुऱ्हान पोलिओचा रुग्ण असून बालपणापासूनच तो ऑस्लोमध्ये राहतो.
नॉर्वेमध्ये तो अभिनेता सलमान खानच्या बीइंग ह्युमन कॅम्पेनचे प्रतिनिधित्व करतो. २०१७मध्ये त्याला मोस्ट इंस्पिरेशनल मॅनचा पुरस्कारही मिळाला होता. फौजिया पाकिस्तानच्या पंजाब प्रांताची राहणारी आहे.
बालपणापासून पोलिओग्रस्त असलेला बुऱ्हान व्हीलचेयरवरच आपले आयुष्य जगत आहे. मात्र आपल्या जीवनात तो अतिशय मौजमस्ती करतो. बुऱ्हान एखाद्या सिलेब्रिटीला भेटतो, तेव्हा त्याची छायाचित्रे सोशल मीडियावर शेयर करतो.
फौजिया सांगते की, बुऱ्हानवर तिचे मनापासून प्रेम आहे. ते व्यक्त करण्यासाठी तिने आपल्या हातावर त्याच्या नावाचा टॅट्टूही गोंदवून घेतला आहे. आपल्या विवाहप्रसंगी बुऱ्हानने केलेल्या नृत्याचा एक खास व्हिडीओही समोर आला आहे.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe