पीकविम्यासाठी शेतकऱ्यांचा ‘रास्तारोको’…!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- आजवर शेतकरी सरकारकडून मिळेल ते निमूटपणे स्वीकार करत होते. मात्र आता त्यांना देखील आपल्या अधिकार व हक्काची जाणीव झाली आहे. त्यामुळे आता ते त्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरत आहेत. त्याअनुषंगाने मागील वर्षी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली होती.

त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची उभी पिके नष्ट झाली होती. सरकार कडून या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून अनुदान देण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र वर्ष उलटले तरी देखील या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत दिली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी रास्तोरोको केला.

दरम्यान आंदोलकांना लेखी आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला. शेवगाव तालुक्यातील जवळपास दोनशेच्या वर शेतकऱ्यांचे २०२०/२१ मधील खरीप हंगामातील पिक विमा आणि अतिवृष्टीचे अनुदान अद्यापपर्यंत मिळाले नाही.

त्यामुळे अनुदानापासुन वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी गेल्या महिन्यात तलाठी तसेच तहसिलदार यांना निवेदने देत अनुदान तसेच अतिवृष्टीचे पैसे जमा करण्याची मागणी केली.

या मागणी संदर्भात विचार करून कार्यवाही करु.असे आश्वासन दिले होते.परंतु महिना उलटुन देखील याचा विचार न झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी शेवगांव-गेवराई राज्यामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe