अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- कोरोना विषाणूने पुन्हा एकदा अमेरिकेत हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. अमेरिकेत मागील २४ तासांत १ लाखांहून अधिक कोरोना रूग्ण सापडले आहेत. तर बरे होण्याचे प्रमाण पाहिले असता, रूग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे.
अमेरिकेत सध्या १ लाख ६ हजार ८४ इतके नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात नव्या रुग्णांची संख्या ७३ टक्क्यांनी वाढली आहे. अमेरिकेत कोरोनाचा धोका वाढला असून ही संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा ठरू शकते.
काही महिन्यांपूर्वी अमेरिकेत दोन डोस घेतलेल्यांनी मास्क लावण्याची आवश्यकता नसल्याचं म्हटलं होतं. मात्र आता पुन्हा नियमांमध्ये बदल केले जात आहेत. अमेरिकेत सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे. कोरोनाचा नवा डेल्टा व्हेरिएंट हा लस घेतलेल्यांमध्येही आढळत आहे.
हा नवा व्हेरिएंट वेगाने पसरत आहे. त्यामुळे मास्क बंधनकारक करण्यात येत आहे. हा व्हायरस अधिक संसर्गजन्य आणि धोकादायक असल्याचं म्हटलं जात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनीही नव्या डेल्टा व्हेरिएंटपासून सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलं आहे.
भलेही लसीकरणामुळे मृतांची संख्या कमी असली, तरी लस घेतलेल्यांनाही लागण होत असल्याने चिंता वाढली आहे. दुसरीकडे लस न घेणाऱ्यांना वेगाने संसर्ग होत आहे. त्यामुळे असे रुग्ण तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम