अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातून मनाला चटका लावणारी बातमी समोर आली आहे, अवघ्या पाच वर्षाच्या चिमुरड्याने डोळ्यादेखत आपल्या पित्याचा मृत्यूचा थरार पाहिला. कारण त्या क्षणी कोणीच काही करू शकत नव्हते.
पत्नीही हतबल होती याबाबत सविस्तर वृत्त असे कि बुधवारी (ता.२८) दुपारी राहुरी कारखाना येथे डॉ. तनपुरे साखर कारखान्याच्या पेपर मिलसमोरील तलावात ही घटना घडली. तलावात मासे पकडण्यासाठी निकाळजे कुटुंब आले होते. त्यांनी दुपारी अडीच वाजता तलावाच्या काठावर जेवण केले.
त्यावेळी कारखाना सुरक्षारक्षकांनी त्यांना ‘येथे थांबू नका,’ असे बजावले. सुरक्षारक्षक निघून गेले. जेवण झाल्यावर भानुदास जनार्दन निकाळजे (वय ४०, रा. प्रसादनगर, राहुरी कारखाना) मासे पकडण्यास गेले. दुपारी तीन वाजता त्यांचा पाय घसरला. तलावातील एका लोखंडी अँगलला आदळून निकाळजे पाण्यात पडले.
पाय घसरून एक जण तलावात पडला. तलावाच्या काठावरील पत्नी व पाच वर्षांच्या चिमुरड्याने हंबरडा फोडला. बघ्यांची तोबा गर्दी जमली; परंतु कोणालाच पोहता येत नसल्याने सर्व जण हतबल ठरले. डोळ्यांसमोर पतीला पाण्यात बुडताना पाहण्याचा दुर्दैवी प्रसंग पत्नीवर ओढवला.
एक तासानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. तलावात सुमारे चार-पाच फूट गाळ, त्यावर दहा-बारा फुटांपर्यंत पाणी आहे. निकाळजे यांचे डोके गाळात रुतल्याने त्यांना वर येता आले नाही. डोळ्यासमोर नवरा पाण्यात पडल्याने पत्नी व मुलाने हंबरडा फोडला. बघ्यांची तोबा गर्दी जमली.
कारखान्याचे सुरक्षारक्षक, पोलिस व देवळाली प्रवरा नगरपालिकेचे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. सायंकाळी चार वाजता मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले. निकाळजे यांच्या मागे आई, आजी, पत्नी, एक मुलगा व दोन मुली, असा परिवार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम