अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- आत्ताच्या आत्ता मला माझी बायको आणून द्या, नाहीतर मी माझा गळा चिरून मरतो. असे म्हणत एकाने थेट पोलिसस्टेशन समोरच स्वत:च्या हातातील ब्लेड गळयाला लावून आत्महत्येची धमकी दिल्याची घटना घडली आहे.
रोहित दीपक काळे असे त्या तरूणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, काल रात्री १०च्या सुमारास एक मुलगा हातात दाढी करण्याचे ब्लेड घेऊन पोलिस स्टेशनला आला.
अंगावर वार केले होते त्यातून रक्त वाहत होते. तो पोलिसांना म्हणाला की माझ्या बायकोस माझा सासरा पितांबर हा सातारा येथे घेऊन गेला आहे.
माझी बायको आत्ताच्या आता आणून द्या नाहीतर मी माझा गळा तुमच्यासमोर कापून घेईल, असे म्हणत त्याने स्वत: च्या हातातील ब्लेड स्वत:च्या गळ्याला लावले.
त्यावेळी पोलिसांनी त्याची समजूत काढून तुझी बायको आणून देतो असे म्हटले, परंतु तो धमकी देतच राहिला व मी आत्महत्या करील असे म्हणत होता.
यावेळी ठाणे अंमलदाराने त्याच्या सासऱ्याचा नंबर विचारून घेत तेथूनच फोन केला व त्याच्या पत्नीशी फोनवर बोलून त्यास गुंतवून ठेवत इतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्या हातातील ब्लेड काढून घेतले. नंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम