चारचाकी गाडी व ५ लाखांसाठी विवाहितेचा छळ

Published on -
संगमनेर- अकोले तालुक्यातील कोंभाळणे, लिंगदेव परिसरात सासरी नांदत असताना विवाहित तरुणी सुवर्णा संतोष बांबळे ( हल्ली रा. गिरीराज कॉलनी, नवलेवाडी, अकोले) 
या तरुणीस माहेरुन चारचाकी गाडी आण, ५ लाख रुपये आण, असे म्हणत तिचा शारीरिक मानसिक छळ केला. उपाशीपोटी ठेवून शिवीगाळ करुन पैसे व गाडीची मागणी करुन घराबाहेर हाकलून दिले.
या त्रासास कंटाळून सुवर्णा बांबळे या तरुणीने काल अकोले पोलिसात फिर्याद दिल्यावरुन आरोपी नवरा संतोष शरद बांबळे, सासू ताराबाई शरद बांबळे, सासरा शरद रघुनाथ वांबळे, सुनंदा ज्ञानेश्वर लोखंडे, रा. कोंभाळणे लिंगदेव यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला असून पो.ना गोराणे हे पढील तपास करीत आहेत.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News