अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :- राहुरी तालुक्यातील वांबोरी फाट्यानजीक असलेल्या एका हाॅटेलवर अट्टल सराईत गुन्हेगार घातक हत्यारासह राहुरी पोलीसांनी पकडून त्याला गजाआड केले आहे.
बुधवार दि २८ जुलै रोजी दुपाराच्या दरम्यान पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्यासह राहुरी पोलीस गस्त घालत असताना हाॅटेल मुस्कान परिसरात कंबरेला चाकू लावलेला सराईत गुन्हेगार मालकास शिविगाळ करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.
पो.नि. दुधाळ, अजिनाथ पाखरे, संतोषकुमार राठोड आदिंसह राहुरी पोलीसांनी त्या ठिकाणी तात्काळ धाव घेत काशिनाथ बबन शिंदे(वय ३५ राहणार वैदुवाडी सावेडी, जिल्हा अहमदनगर) यास ताब्यात घेतले असता त्याकडे घातक हत्यार आढळून आले तर तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याचे समोर आले.
त्याच्यावर अहमदनगर तोफखाना पोलीस ठाण्यात जुगार,पर्यावरण संरक्षण कायदा आणि सार्वजनिक मालमत्ता संरक्षण कायद्यानुसार विविध गुन्हे दाखल असल्याच देखील पुढे समोर आले आहे.
त्याची झाडझडती घेतली असता त्याकडे चाकु आणि एक तलवार देखील आढळून आल्याने त्याच्या विरोधात भारतीय हत्यार कायदा कलम ४\२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुरी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक तुषार धाकराव हे पुढील तपास करत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम