पोलिसांची धडक कारवाई ! 7 गावठी कट्ट्यांसह 14 गुन्हेगार जेरबंद

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :- जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढू लागली आहे. यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ लागली आहे. यामुळे आता पोलीस प्रशासन देखील आक्रमक होऊन कारवाया करू लागले आहे. नुकतेच जिल्ह्यातील नेवासा, श्रीरामपूर व राहुरी या तालुक्यामध्ये पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवले.

यात पोलिसांनी 14 गुन्हेागारांना जेरबंद करतानाच त्यांच्याकडून 7 गावठी कट्टे, 8 जिवंत काडतुसे व 3 तलवारी हस्तगत केल्या आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर, नेवासा व राहुरी तालुक्यातील 81 सराईत गुन्हेगारांची माहिती संकलित करण्यात आली होती.

सदर माहिती वरिष्ठांकडे पाठवण्यात आली.वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवायांसाठी जिल्ह्यातील 25 पोलीस उपनिरीक्षक व 350 पोलीस अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. त्यानंतर काल 29 जुलै रोजी पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी श्रीरामपूर, नेवासा व राहुरी तालुक्यामध्ये कारवाई घेत 81 गुन्हेगारांच्या घरझडत्या घेऊन अवैध शस्त्राचा शोध घेण्यात आला.

यात पोलिसांनी 14 गन्हेगारांना जेरबंद करत 7 गावठी कट्टे, जिवंत काडतुसे असा 2,13,900/-रु. किमतीची अवैध शस्त्रे जप्त हस्तगत केली आहेत. ताब्यात घेण्यात आलेले आरोपींविरोधात यापूर्वी दरोडा, जबरी चोरी, मारामारी, खुनाचा प्रयत्न, अवैधरित्या शस्त्र बाळगणे, विनयभंग, चोरी, दरोडयाची तयारी करणे अशा गंभीर स्वरुपाचे खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

गुन्हेगारांची नावे यात अशोक उर्फ देवा जालिंदर लष्करे, (रा. संभाजीनगर, नेवासा फाटा, ता. नेवासा), रितेश पुनमचंद साळवे, (रा. मक्तापूर, ता. नेवासा), शुभम विश्वनाथ गर्जे, (रा. बडुले, ता. नेवासा), लक्ष्मण सहादू अडांगळे, (रा. गंगानगर, ता. नेवासा), शाहरुख युनूस पटेल,

(वय-२५ रा. संजयनगर, वॉर्ड नं. 2. श्रीरामपूर), किरण रामू धोत्रे, (रा. बाजारतळ, वॉर्ड नं. 3, श्रीरामपूर), अनिल बाळू इरले, (रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी), केलास रामू धोत्रे, (रा देवळाली प्रवरा, ता. राहुरी), काशिनाथ बबन शिंदे, (वय-35 रा. बेवाडी, सावेडी, अहमदनगर),

शाहरुख उर्फ चाट्या जावेद शेख, (रा. घोडेगाव, झोपडपट्टी, ता. नेवासा), अनिल कचरु साळुंके, (गंगापूर, जि. औरंगाबाद), मयुर दिपक ताव (श्रीरामपूर), नागेश पाराजी जाधव, (देवळाली प्रवरा ता. राहुरी), सिध्दार्थ अशोक नवले (गंगापूर) या वरील नमुद आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News