जामखेड :- तालुक्यातील युवकाच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे. हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला जाईल. वरिष्ठांनी आदेश दिला तरच विधानसभा लढवू, अन्यथा पक्षश्रेष्ठी जो उमेदवार देतील त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे युवा नेते रोहित पवार यांनी सांगितले.
आरणगाव येथे नागरी सत्काराला उत्तर देताना पवार बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपध्यक्ष दत्तात्रय वारे, जिल्हा सरचिटणीस प्रा.राजेंद्र पवार, माजी सरपंच संतोष निगुडे, युवक तालुकाध्यक्ष शरद शिंदे, जेष्ठ नेते वैजिनाथ पोले, शाखा अध्यक्ष निखिल पंडित, उपाअध्यक्ष मोहसीन शेख, विशाल राऊत, तालुका उपाध्यक्ष गणेश म्हस्के, अर्जुन निगुडे, अमोल दळवी, अविनाश निगुडे यांच्या सह रा कॉ पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.