चक्क शेतकऱ्याच्या शेतातील डाळिंब चोरले! ‘या’ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :-  सध्या चोर,दरोडे, खून, अपहरण, अत्याचार आणि कोरोना असेच काहीसे प्रकार घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माणूस मात्र पुरता बेजार झाला आहे.

एकीकडे हे सर्व सुरू असताना आता तर थेट शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या पिकांची देखील चोरी करण्यात आला आहे. ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथे घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, येथील राघु नारायण कांडेकर यांच्या मालकीच्या शेतात डाळिंबाची बाग आहे.

डाळिंबाच्या बागेतील विक्रीला आलेली डाळिंबाची फळे चोरी होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे काल रात्री राघु यांचे वडील नारायण कांडेकर शेतात राखणी करण्यासाठी गेले होते.

यावेळी त्यांना बागेत काही लोकांचा बोलण्याचा आवाजा आला म्हणून त्यांनी कोण आहे असा आवाज दिला असता बागेतुन काही महिला व पुरुष पळताना दिसले.

त्यांचा पाठलाग केला परंतु ते आंधाराचा फायदा घेऊन फरार झाले. बागेमध्ये पाहणी केली असता या महिला व पुरुषांनी चोरी करुन चालविलेले डाळींब मिळुन आले.

या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात बागेतील सुमारे ६० हजार रुपये किमतीचे एक हजार किलो डाळिंब अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe