टीईटीची परीक्षेची तारीख जाहीर, ‘या’ दिवशी होणार परीक्षा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :-   राज्य सरकारने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-2021 घेण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेवर सोपविली आहे. ही परीक्षा 10 ऑक्टोबरला घेण्याचे निश्चित केले असून, त्यासाठी येत्या मंगळवार दि. 3 ऑगस्ट पासून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रियासुरू होणार आहे.

या निर्णयामुळे भावी लाखो शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम, अनुदानित-विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित अशा शाळांमध्ये शिक्षण सेवक, शिक्षकपदांवर नियुक्तीसाठी उमेदवारांना ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. परीक्षेबाबत सविस्तर माहिती https://mahatet.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

असे असणार आहे टीईटीचे वेळापत्रक :-

  • – ऑनलाइन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी : 3 ते 25 ऑगस्ट
  • – प्रवेशपत्र ऑनलाइन प्रिंट काढून घेणे : 25 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर –
  • शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – एक : 10 ऑक्टोबर (वेळ- सकाळी साडेदहा ते दुपारी एक)
  • – शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – दोन : 10 ऑक्टोबर (वेळ – दुपारी दोन ते सायंकाळी साडेचार)
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe