विखेंच्या ताब्यातील ‘या’ कारखान्याच्या कामगारांचे ना.प्राजक्त तनपुरे यांना साकडे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :-  राहुरी येथील डाँ.तनपुरे सहकारी साखर कारखान्याची महाविरण कंपणीने विज पुरवठा खंडीत केला असुन कामगार वसाहतीत आंधाराचे साम्रज्य पसरल्याने.

नगरसेवक अदिनाथ कराळे यांच्या मध्यस्थीने कामगारांनी उर्जामंञी ना.प्राजक्त तनपुरे यांना साकडे घातले.ना.तनपुरे यांनी सकारत्मक प्रतिसाद देवून डाँ.तनपुरे कारखान्याने ना हरकत प्रमाणपत्र दिल्यास कामगार वसाहतीसाठी स्वतंत्र विज रोहित्र देण्याचे आदेश महावितरणाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

डाँ.तनपुरे साखर कारखान्याचा गेल्या १० दिवसापासून विज पुरवठा खंडीत झाल्याने कामगार वसाहतीत अंधाराचे साम्रज्य पसरले आहे. कारखान्याने विज बिल न भरल्याचा भुर्दंड कामगारांना बसला आहे.देवळाली प्रवरा नगर पालिकेचे नगरसेवक अदिनाथ कराळे यांच्या मध्यस्थीने उर्जामंञी ना.प्राजक्त तनपुरे यांची भेट घेण्याचे ठरविले.

नगरसेवक कराळे यांनी ना.तनपुरे यांच्या कानावर कामगारांचा प्रश्न घातला.ना.तनपुरे यांनी राहुरी फँक्टरी येथे येवून नगरसेवक कराळे यांच्या समवेत कामगारांची भेट घेतली. कामगारांचे प्रश्न समजावून घेतले.

ना.तनपुरे यांनी महावितरणाचे वरीष्ठ अधिकाऱ्याबरोबर कनिष्ठ अभियंता खेडकर यांच्याशी चर्चा करून कामगार वसाहतीसाठी स्वतंत्र विज रोहित्र देण्याचे आदेश महावितरणाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.कामगार वसाहतीसाठी स्वतंत्र विज रोहिञ देण्यासाठी डाँ.तनपुरे साखर कारखान्याने ना हरकत प्रमाणपञ देणे गरजेचे आहे.

बकारखान्याचे ना हरकत प्रमाणपञ दिल्यास लवकरच कामगार वसाहतीत स्वतंत्र विद्युत रोहित्र देऊन विज पुरवठा जोडून देण्यात येणार आहे. डाँ.तनपुरे साखर कारखाना कार्यस्थळावरील आश्वरुढ शिवाजी महाराजांचा पुतळा आंधरात असल्याचे निवेदन कराळे यांनी दिले.

ना,तनपुरे यांनी छञपती शिवाजी माहाराज पुतळ्यासाठी स्वतंञ विज व्यवस्था करण्याचे आदेश दिले. यावेळी देवळाली प्रवरा नगर पालिकेचे नगरसेवक ज्ञानेश्वर वाणी यांच्यासह कामगार सुनील काळे, चंद्रकांत कराळे, सुधीर आहेर,इंद्रभान पेरणे,गोरख पवार,मच्छिंद्र सूर्यवंशी,बाळासाहेब तारडे,मच्छिंद्र भवार,अविनाश गायके आदी कामगार उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe