अहमदनगर :- मागील ५ वर्षाच्या कालावधीतील अनुशेष भरुन काढण्याचे काम चालू आहे. मतदार संघातील सर्व रस्ते उत्कृष्ट करण्याचा माझा निर्धार आहे.
कामांचा दर्जा चांगल्या ठेवण्यावर माझा भर आहे.चालू वर्षी दुष्काळ फार मोठा आहे, सर्वांनी ही परिस्थिती गांभीर्याने घ्यावी, लवकरच टँकर व छावण्या देखील सुरु करणार आहे.
साकळाई योजनेचा देखील पाठपुरावा चालू आहे.राळेगण म्हसोबा येथे धनगरवाडी ते वडगाव तांदळी व वडगांव तांदळी ते साकत या रस्त्याचे भूमिपूजन आ.जगताप यांच्या हस्ते झाले.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत या रस्त्याच्या कामासाठी ३ कोटी ७० लाख ५४ हजार रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला. हा रस्ता ७.९० किलोमीटर लांबीचा आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार शिवाजीराव कर्डिले होते.
यावेळी आ.कर्डिले म्हणाले की, आमदार राहुल जगताप हे नवीन व तरुण असून त्यांचे काम चांगले आहे. सर्वांना बरोबर घेवून कामकरण्याची त्यांची हातोटी चांगली आहे.