अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा कहर अद्यापही कायम आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना पुन्हा एकदा कोरोना पसरू लागला आहे. यामुळे अनेक ठिकाणी कठोर नियमांची अंलबजावणी देखील करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
यातच जिल्ह्यातील संगमनेर, पारनेर, शेवगाव तालुक्यात रुग्णसंख्या वाढू लागली आहे. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शेवगाव तालुका प्रशासनाच्या वतीने शनिवारी शहरातील व्यापाऱ्यांची तहसील कार्यालयात बैठक बोलाविली.
कोरोनाकाळातील शासनाने ठरवून दिलेल्या निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहन प्रशासनाने केले. जिल्हाधिकारी यांनी २६ जूनला दिलेल्या सूचनांचे पालन सर्वांनी काटेकोरपणे करावे.
अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील, तसेच शनिवार व रविवारी आस्थापना पूर्णपणे बंद राहतील, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
एकीकडे कोरोनाची परिस्थिती गंभीर बनत असताना मात्र शेवगाव मध्ये कारवाई हि केवळ दिखाव्यापुरतीच असल्याचे दिसून येते.
प्रशासनाकडून आक्रमक कारवाई होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या मात्र यावर पुढे हालचाली झाल्या नाही. याचाच परिणाम म्हणजे आज तालुक्यात रुग्णसंख्या वाढू लागली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम