अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :- कर्जत तालुक्यातील एकाच्या घरात भरदुपारी चोरी झाली. चोरटयांनी घरातून लाखोंचा माल लंपास केला. याप्रकरणी शितपूरचे रामचंद्र गायकवाड (वय 67) यांनी चोरीची घटनेची माहिती ताईने कर्जत पोलिसांना दिली. पोलीस पथक फौजफाट्यासह शितपूरमध्ये दाखल झाले.
त्यावेळी चोरटे नागलवाडी गावाच्या दिशेने पळाल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यांनी तात्काळ नागलवाडीतील लोकांना फोन केले व चोरटे पळालेल्या दिशेने पाठलाग करत असतांना आरोपी ढेबर्या उर्फ रामेश्वर राम चव्हाण (वय 25) रा. ब्रह्मगाव, (ता.आष्टी, जिल्हा बीड) यास पकडण्यात आले.
त्यानंतर राबवलेल्या शोध मोहिमेत पोलिसांनी आष्टी येथे रामेश्वर जंगल्या भोसले (वय 25) व धला उर्फ मोहिनी रामेश्वर भोसले (वय 22), रा. आष्टी यांना ताब्यात घेतले. त्यांची विचारपूस आणि झडती घेतली असता चोरीतील काही माल त्यांच्याकडे मिळून आला.
पोलिसांनी या आरोपींना अटक खाक्या दाखवताच ढेबर्या चव्हाण (वय, 45) रामेश्वर भोसले, (वय 26 वर्ष), कुकड्या भोसले, (रा. पिंपरखेड) यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले. या आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली एक दुचाकी, मोबाइल, सोन्यांचे दागिने, रोख रक्कम असा 1 लाख 62 हजारांचा जप्त करण्यात आला.
अटक करण्यात आलेल्या आरोपींवर यापूर्वीचे घरफोडी, जबरी चोरी, दरोडा, दरोड्याचा प्रयत्न असे 4 गुन्हे दाखल आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम