इतर व्यवसाय सुरू आहेत, मग मंदिरच बंद का?

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :-  जिल्हातील सर्व व्यवसाय पूर्ण क्षमतेने सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र,शिर्डीतील साईमंदिर सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. साई मंदिरावरच शिर्डीच अर्थकारण अवलंबून असल्याने साई मंदिर खुले करण्याची मागणी शिर्डीकरांनी केली आहे.

जिल्ह्यात बाकी सर्व आस्थापना सुरू आहेत, इतर व्यवसाय सुरू आहेत, मग मंदिरच बंद का, असा सवाल उपस्थित करत शासनाकडून आता सक्तीने मंजुरी घेण्याची वेळ आली असल्याचे मत कुमावत समाज विकास सेवा संस्थेचे राज्य उपाध्यक्ष संजय परदेशी यांनी व्यक्त केले आहे.

साई मंदिर उघडण्याची मागणी सर्व कुमावत बांधवांनी समाजमाध्यमातून लावून धरा. कारण उसनवारी किती दिवस करायची, कुणी उसने द्यायलाही तयार नाही. उपासमार सुरू झाल्याने आता लोकांचा संयम संपला आहे, तेव्हा अराजकता निर्माण होण्यापूर्वी शासनाने गंभीर दखल घेऊन साई मंदिर सुरू करावे, कारण त्यावर अनेकांचे रोजगार अवलंबून आहेत.

या पार्श्वभूमीवर उपाशी मरण्यापेक्षा कुमावत समाजाने मंदिर उघडण्यासाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू केल्याने साईमंदिर बंद करण्यात आले. त्यामुळे शिर्डीतील अर्थकारण पुर्णत: ठप्प झाले आहे.

शिर्डीतील सर्व व्यवसाय हे साई मंदिरावर अवलंबून असल्याने मंदिर खुले करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. लॉकडाऊनमुळे हार-फुल विक्रेते, हॉटेल व्यवसायिकांची आर्थिक कोंडी झाली आहे. मंदिर खुले करण्याचा निर्णय तात्काळ घ्यावा अन्यथा नागरिकांमध्ये संतोषची भावना उमटू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe