अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :- कोरोनाव्हायरस पाठोपाठ राज्यात झिका व्हायरसनेही शिरकाव केल्याने एकच खळबळ उडाली . ज्या पुण्यात कोरोनाचा राज्यातील पहिला रुग्ण सापडला तिथंच झिका व्हायरसचाही पहिला रुग्ण सापडला. पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे झिका आजाराचा एक रुग्ण आढळून आला.
एका 50 वर्षीय महिलेला झिका व्हायरसची लागण झाली आहे. हा या आजाराचा महाराष्ट्रातील पहिला रुग्ण आहे. झिका आजाराची लागण झालेली महिला पूर्णपणे बरी झाली असून तिला तसंच कुटुंबियांमध्येही कोणाला काही लक्षणे नाहीत, असे आरोग्य विभागामार्फत कळवण्यात आलं आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं की, “या रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडली आहे. आता हा रुग्ण पूर्णपणे ठिक आहे” पुणे जिल्हयातील पुरंदर तालुक्यात झिका व्हायरसचा रुग्ण आढळून आला आहे.
याबाबत काळजी करण्याची गरज नाही. या आजाराच्या रुग्णामध्ये जी लक्षणे आढळून आली आहेत, त्यानुसार संबंधित रुग्णावर उपचार केले जात आहेत.
पुरंदर तालुक्यात साठलेल्या गोड पाण्यावर एडिस डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणून आवश्यक पाऊले उचलून सर्वेक्षण करण्याचे आदेश आरोग्य विभागाला देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम