कोरोनाच्या तिसऱ्या लाटेशी लढण्यासाठी ‘ही’ लस ठरेल प्रभावी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- देशात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लसीकरण मोहीम अत्यंत वेगाने सुरु आहे. यातच कोरोनाचा नवीन व्हेरियंत आला आहे. यामुळे आता धोका अधिक वाढला आहे.

अशा परिस्थितीत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशातील कोरोना लसीच्या संशोधनाबरोबरच त्यांच्या प्रभावाबाबत देखील संशोधन केले जात आहे.

इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने केलेल्या अभ्यासात असा दावा की, कोरोना लस Covaxin ही डेल्टा प्लस व्हेरिएंटविरूद्ध अधिक प्रभावी आहे.

भारत बायोटेकची कोरोना लस ‘कोव्हॅक्सिन’ इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आली आहे.

यापूर्वी कोव्हॅक्सिनचा प्रभावीपणा कोरोना विषाणूविरूद्ध 77.8 टक्के आणि नवीन डेल्टा व्हेरिएंटविरुद्ध 65.2 टक्के प्रभावी आहे. तर गंभीर लक्षणांच्या प्रकरणांमध्ये कोव्हॅक्सिन 93.4 टक्के प्रभावी असल्याचे भारत बायोटेककडून सांगण्यात आले होते.

भारतात सध्या एकूण कोरोना रुग्णांपैकी 90 टक्के रुग्ण डेल्टा व्हेरिएंटमुळे झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, ब्रिटन आणि अमेरिकेत डेल्टा व्हेरिएंट वेगाने पसरत आहे.

डेल्टा व्हेरिएंट इतर तीन व्हेरिएंट ऑफ कंसर्नच्या तुलनेत अधिक वेगाने पसरत आहे आणि रुग्णासाठी देखील धोकादायक ठरत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe