अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या संसर्गात पुन्हा वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्याचा आरटीपीसीआर चाचण्यांच्या बाधित दर (पॉझिटीव्हीटी रेट) मागील आठवड्यात जवळपास आठ टक्के इतका झाला आहे.
हा दर असाच वाढत राहिल्यास जिल्ह्यात पुन्हा अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद करावे लागतील. काही ठिकाणी परवानगी दिलेल्या व्यतिरिक्त आस्थापना सुरु असल्याचे दिसत आहे.
अशा आस्थापना बंदची कारवाई करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी तालुकास्तरीय यंत्रणांना दिले. करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे घेतला जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, जिल्ह्यात सातत्याने रुग्णवाढ नोंदवली जात आहे.
ही रोखण्यासाठी स्थानिक यंत्रणेने प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करणे आणि कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन या महत्वाच्या बाबींकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
दरम्यान राज्यात 25 जिल्ह्यातील कोरोना निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, तर 11 जिल्ह्यात अद्यापही लेवल 3 चे निर्बंध कायम आहेत. त्यात नगर जिल्ह्याचाही समावेश आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम