मंगल कार्यालय व सांस्कृतिक भवन यांची घरपट्टी व शास्ती माफ करावी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :-नगर शहरातील मंगल कार्यालय व सांस्कृतिक भवन यांच्यावर लावण्यात आलेली घरपट्टी व शास्ती माफ करावी, या मागणीचे निवेदन नगर शहर मंगल कार्यालय, लॉन्स असोसिएशनच्यावतीने महापौर रोहिणी शेंडगे व आयुक्त शंकर गोरे यांना देण्यात आले.

करोना महामारीमुळे गेल्या वर्षी मंगल कार्यालयामध्ये एकही लग्न सोहळा पार पडलेला नाही. मंगल कार्यालयाची भांडवली गुंतवणुक, कामगारांचा पगार, बँकांचे हप्ते, वीज बिल, इतर टॅक्सेस त्याचबरोबर महानगरपालिकेचा करांचा भार कार्यालयांच्या मालकांवर येऊन पडलेला आहे.

पुढेही होऊ केलेल्या सहा महिन्यांत एकही कार्यक्रम मंगल कार्यालयात होण्याची चिन्ह नाहीत. त्यामुळे कार्यालयधारक चालू वर्षी घरपट्टी व शास्ती भरु शकणार नाही, तरी ती माफ करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. गेल्या दीन वर्षांपासून शासनाने सार्वजनिक, धार्मिक, लग्न सोहळे यांना बंदी घातल्यामुळे मंगल कार्यालय बंद आहेत.

अजुन किती दिवस बंद राहिल हेही सांगता येत नाही. त्यामुळे सध्या यावर अवलंबून असणार्या लाखो लोकांवर बेकारीची कुर्हाड कोसळली आहे. त्यामुळे शासनाने या घटकांसाठी पॅकेज जाहीर करावे किंवा शासनाचे विविध टॅक्स माफ करावे, अशी मागणी होते आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe