अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :- पतीला दुकान खरेदी करण्यासाठी माहेरून आठ लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी विवाहितेचा सासरी शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी तिच्या पतीसह सासू-सासरे व दिर यांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
11 जून 2020 ते 16 जुलै 2021 दरम्यान शहरातील सावेडी परिसरातील तलाठी कार्यालयाच्या मागे असलेल्या विवाहितेच्या सासरच्या घरी घटना घडली. याप्रकरणी पीडित विवाहिता मृणाल ऋषिकेश चव्हाण (वय 23) हिने 23 जूले रोजी दिलेल्या फिर्यादीवरून तिचा पती ऋषिकेश रमेश चव्हाण,
सासरा रमेश सुखदेव चव्हाण, सासु ज्योती रमेश चव्हाण व दीर चिराग रमेश चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती ऋषिकेश चव्हाण याला फोटोग्राफीचा व्यवसायासाठी दुकान खरेदी करण्यासाठी आरोपींनी पीडित महिलेचेच्या आईवडिलांकडून आधी दोन लाख रुपये घेतले होते व परत आठ लाख रुपयांची मागणी करत होते.
विवाहितेने माहेरून पैसे आणण्यास नकार दिल्याने सासूने तिच्या हाताला उलथनीचा चटका देऊन मारहाण करत घरातून हाकलून दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम