संगमनेर :- शिवसेनेने फोडलेल्या सगळ्या डरकाळ्या पोकळ निघाल्या आहेत. गेल्या चार वर्षांत भाजपकडून शिवसेनेची सर्वात जास्त अवहेलना झाली आहे.
जे बोलतो ते खरे करतो, असे सांगणाऱ्यांनी त्यांचेच वक्तव्य खोटे करून दाखवण्याचे काम केले आहे. जनतेला भाजप-शिवसेना युती मान्य होणार नाही.
शिवसेनेला कशाची भीती वाटली की त्यांनी युती केली, असा सवाल आमदार बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी एका कार्यक्रमात प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.
देशातील आणि राज्यातील सरकारला जनता वैतागली आहे. लोकांनी आपला निर्णय घेतला आहे. त्यामुळेच भाजप आणि शिवसेनेने घाबरून जाऊन युती केल्याची टीका थोरात यांनी केली.