अहमदनगर कोरोना अपडेट : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ८९५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ९० हजार १३६ इतकी झाली आहे.रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.८९ टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८७१ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ६ हजार १९५ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १५०, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३३६ आणि अँटीजेन चाचणीत ३८५ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०९, नगर ग्रा. ११, नेवासा ०२, पारनेर ५५, पाथर्डी १९, संगमनेर ०९, श्रीगोंदा ४३ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १७, अकोले ११, जामखेड ०४, कर्जत १२, कोपरगाव २१, नगर ग्रा.२८, नेवासा १७, पारनेर २०, पाथर्डी ०७, राहता २३, राहुरी ०५, संगमनेर १११, शेवगाव ४०, श्रीरामपूर १३ आणि इतर जिल्हा ०६ आणि इतर राज्य ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ३८५ जण बाधित आढळुन आले. मनपा ०८, अकोले ३३, जामखेड १२, कर्जत ३०, कोपरगाव १३, नगर ग्रा. ०८, नेवासा ३९, पारनेर ६१, पाथर्डी ३४, राहता १९, राहुरी ११, संगमनेर ३८, शेवगाव ३१, श्रीगोंदा २८, श्रीरामपूर १७ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ०५, अकोले ४०, जामखेड ६५, कर्जत ९६, कोपरगाव १५, नगर ग्रा. ५१, नेवासा ५२, पारनेर १४१, पाथर्डी ४७, राहता १०, राहुरी २५, संगमनेर २९१, शेवगाव १५, श्रीगोंदा २२, श्रीरामपूर १८, कॅंटोन्मेंट बोर्ड ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या:२,९०,१३६

उपचार सुरू असलेले रूग्ण:६१९५

पोर्टलवरील मृत्यू नोंद:६२५४

एकूण रूग्ण संख्या:३,०२,५८५

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe