अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :- राहुरीचा डाॅ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे आजीमाजी सत्ताधाऱ्यांच्या काळातील अनेक पगार थकीत आहेत.साखर कारखान्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज झाल्याने कारखान्याचा ताबा जिल्हा बॅंकेकडे गेला होता.
माञ ५ वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकी नंतर जिल्हा बॅंकेचे जेष्ठ संचालक व माजी आमदार शिवाजी कर्डीले यांच्या मदतीने व खासदार डॉ.सुजय विखे यांच्या प्रयत्नाने बंद पडलेला राहुरीचा डाॅ.तनपुरे सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू होण्यास मदत झाली होती.
या ५ वर्षाच्या कालावधीत डाॅ.तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे ३ गळीत हंगाम पार पडले तर ऊसाची टंचाईमुळे दोन गळीत हंगाम बंद ठेवण्यात आले होते.
माञ ३ गळीत हंगामासाठी ऊस उत्पादक सभासद व साखर कामगारांची मोलाची मदत झाली असली तरी या काळात कामगारांची देणी थकल्याने बहुतांशी कामगारांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ७ मे पासुन साखर कामगारांना घरीच थांबण्याचे प्रशासनाकडुन सांगण्यात आले आहे.
तीन महिन्यापासुन घरी असलेल्या कामगारांना कामावर कधी घेणार ? याबाबत डाॅ.तनपुरे सहकारी साखर कारखाना पदाधिकारी व प्रशासनाकडुन कुठलीही हालचाल दिसुन येत नसल्याने साखर कामगार एकञ येवुन हक्कासाठी लढा उभारण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.
या आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी गुरूवारी कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. कामगारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन इंद्रभान नाना पेरणे. सचिन काळे,संदीप शिंदे,सिताराम नालकर, बाळासाहेब तारडे यांनी केले आहे.
कोट्यवधी रूपयांच्या कर्जापायी बंद पडलेला राहुरीचा डाॅ.तनपुरे सहकारी साखर कारखाना ५ वर्षापुर्वी जिल्हा बॅंकेचे जेष्ठ संचालक शिवाजी कर्डीले यांच्या मदतीने सुरू झाला होता.
या ५ वर्षाच्या कालावधीत कारखान्याचे ३ गळीत हंगाम होऊन सरासरी ६ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप झाले आहे.ऊसाच्या टंचाई मुळे मधल्या काळात ऊसाचे दोन गळीत हंगाम बंद ठेवण्यात आले होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम