तरुणाकडे आढळून आली विनापरवाना तलवार; पोलिसांनी केली कारवाई

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :- विनापरवाना बेकायदेशीररीत्या तलवार बाळगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. हि कारवाई श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर एक परिसरातील दशमेश चौक येथे करण्यात आली आहे.

संबंधित तरुणाविरुद्ध आर्म ऍक्ट खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक पवार

यांना माहिती समजली कि, मनोज नवनाथ इंगळे ( वय 32, रा. गोंधवणी रोड, वॉर्ड नंबर 1, श्रीरामपूर) याच्याकडे एक धारदार व टोकदार तलवार विनापरवाना बेकायदेशीररीत्या आहे.

पोलिसांनी तातडीने तरुणाला ताब्यात घेतले व त्याच्याकडून तलवार जप्त केली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक दिघे हे करीत आहेत. पोलिसांनी तात्काळ इंगळे याला अटक केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News