अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :- कोरोनाकाळात जिल्हा परिषदेतील लिफ्ट बंद करण्यात आले ते आजपर्यंत बंदच आहे. जिल्हा परिषदेचे कामकाज जून महिन्यांपासून पूर्ववत सुरू झाले आहे. जिल्ह्यातील नागरिक विविध कामांसाठी जिल्हा परिषदेमध्ये येत आहेत. लिफ्ट बंद असल्यामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
लिफ्ट त्वरित सुरू करावे, अशी मागणी अभ्यंगतांमधून होत आहे. जिल्ह्याचा एवढा मोठा कारभार पाहणारी जिल्हा परिषदही संस्था आहे. मात्र, दीड वर्षात साधी लिप्ट दुरुस्त करू शकत नाही. आर्थिक हितसंबंध असणारे टेंडर , गाड्या विशेष बाब म्हणुन त्वरीत मंजूर होतात.
मग लिप्ट काम विशेष बाब म्हणून का होत नाही, असा प्रश्न जिल्ह्यातील पडलेला आहे. जिल्ह्यात अनेक पंचायत समितींना सहा ते सात कोटी रुपयांच्या इमारती बांधल्या. मात्र, तेथील वीज कनेक्शन कट असून त्यामुळे संगणक बंद आहेत. साफसफाईचे टेंडर संपले म्हणून साप सफाई बंद असून त्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य आहे.
अधिकार्यांना या बाबत विचारणा केली असता त्याला तरतूद नाही असे सांगतात मग कोट्यवधी रुपयांच्या इमारती बांधल्या कशाला ? असा प्रश्न आहे.
अधिकारी-पदाधिकारी यांनी या विषयाकडे त्वरीत लक्ष देणे गरजेचे आहे नाही अन्यथा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करावे लागेल असा इशारा भाजप गटनेते जालिंदर वाकचौरे आणि सदस्य सोमनाथ पचारणे यांनी दिला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम