नगर शहरातील लॉकडाऊन शिथिल करा! ‘या’ राजकीय पक्षाची आयुक्तांकडे मागणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :- कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्ह्यात अंशत: लॉकडाऊन लावण्यात आले आहे. दरम्यानया काळात नगर शहरात गेल्या महिन्यभरापासून कोरोना रुग्णांमध्ये घट झाल्याने नियम शिथील करुन  हे लॉकडाऊनची वेळ रात्री 8 पर्यंत करावी, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अहमदनगर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात लॉकडाऊन लावण्यात आलेले आहे. सदर लॉकडाऊनची वेळ ही दुपारी ४ वाजेपर्यंतची आहे. अहमदनगर शहरात कोरोना रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस कमी होतांना दिसून येत आहे.

लॉकडाऊनमुळे शहरातील छोटे व्यापारी, व्यावसायिक, फेरीवाले यांच्या व्यवसायावर परिणाम होत असून त्यांचे अनोनात हाल होत आहे. व्यावसायिक घडी बसविण्यासाठी अहमदनगर महानगरपालिका क्षेत्रासाठी लॉकडाऊनचे नियम शिथील करावेत व व्यवसायिकांना रात्री ८ वाजेपर्यंत व्यावसाय सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.