साखर आरोग्यासाठी वाईटच ; पण ‘ह्या’ 5 प्रकारच्या साखर शरीरासाठी आहेत अत्यंत फायदेशीर

Ahmednagarlive24
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- आज जवळजवळ प्रत्येक माणूस मधुमेह या आजाराशी परिचित आहेत. जर आहारात साखर अधिक प्रमाणात वापरली गेली, तर त्यामुळे आपल्या शरीरातील प्रणालीच्या कार्यात बिघाड होऊ शकते आणि त्या बरोबरच उच्च रक्तदाब,

मधुमेह, हृदयविकाराच्या समस्या यासारख्या अनेक गंभीर आजारांची लागण होऊ शकते. यासाठी आम्ही याठिकाणी आपणास साखरेचे 5 पर्याय सांगत आहोत ज्याचा वापर आपल्या आरोग्यास फायदेशीर ठरेल.

1 खडी साखर – यामध्ये समृद्ध पोषक घटक असतात. हे कॅल्शियम आणि खनिजांनी समृद्ध असते. ते परिष्कृत केले नसल्याने शरीरास लाभदायक असतात.जर तुमचा खोकला खूप दिवस बरा होत नसेल, कफ साठून राहिला असेल तर त्यासाठी खडीसाखर हा एक प्रभावी उपाय आहे. जर तुम्हाला असा अशक्तपणा जाणवत असेल तर रक्ताची तपासणी करून हिमोग्लोबिनचे प्रमाण बघितले पाहिजे. ज्यांना ऍनेमियाचा त्रास असतो त्यांच्यासाठी खडीसाखर अतिशय फायदेशीर आहे. यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत होते.

2 नारळी साखर – नारळ साखर देखील साखरेचा चांगला पर्याय आहे. हे नारळाच्या झाडामधून निघणारे गोड द्रव्यास तयार करून बनविले जाते. जरी ह्यात साखरे सारखे कॅलोरी असले तरी ग्लायसेमिक इंडेक्स साखरपेक्षा कमी असते. जे आपले शरीर सहज पचवू शकते.

3 खजूराची साखर – खजूरचा गोडासाठीचा पर्याय एक उत्तम पर्याय आहे. कोरड्या खजूरांना बारीक करून साखऱ्या ऐवजी वापरा. हे चॉकलेट, पेस्ट्री, सांजा, केक किंवा इतरत्र वापरले जाऊ शकते. जरी ह्याचा वापर चहा, कॉफीमध्ये होऊ शकत नसला तरी ह्याचा वापरामुळे हाडं मजबूत होतात.

4 गूळ – गुळामधील जीवनसत्वे आणि खनिजांसह सर्व पोषकद्रव्ये देतात. ह्याचे गुणधर्म उष्ण असल्याने सर्दी आणि पडस्यात फायदेशीर असतात.

5 कच्चा मध – बाजारात मिळणाऱ्या मधाऐवजी कच्चा मध घेणे चांगले असते. हे आपल्याला निव्वळ गोडपणाचं देत नसून वजन पण नियंत्रित ठेवते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe