लंके मारहाण प्रकरणी नवा ट्विस्ट… लिपिक म्हणतो असो काही घडलंच नाही

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- पारनेर विधासभा मतदारसंघांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी लसीकरणाचे काम करणाऱ्या लिपीकाला मारहाण केल्याची बातमी सोशल माध्यमांवर व्हायरल होत आहे.

मात्र आता या प्रकरणी एक नवीनच ट्विस्ट समोर आला आहे. लंके यांनी मला कोणत्याही प्रकारची अरेरावी, शिवीगाळ किंवा मारहाण केलेली नाही. त्यांच्या विरुद्ध मी कोणाकडेही स्वतः अर्ज केलेला नाही. परंतु सोशल मिडियावर आज (दि. ५) दुपारपासून आ. लंकेंकडून मारहाण झाल्याच्या पोस्ट फिरत आहेत.

याद्वारे समाजमाध्यमांमध्ये माझी बदनामी होत आहे’, असा खुलासा करत लिपिक पाटील यांनी मारहाणीचा प्रकार धादांत खोटा असल्याचं म्हटलंय. या संदर्भात लिपिक पाटील यांनी पोलिस निरीक्षकांना पत्र दिलंय.

त्या पत्रात त्यांनी म्हटलंय, की दि. ४ ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ग्रामीण रुग्णालयात गेलो असता तिथे लसीकरणाच्या टोकन वाटपावरून गोंधळ सुरु होता. या गोंधळाबाबत अज्ञात नागरीकाने आ. निलेश लंके यांना फोन केल्यानंतर काही वेळाने ते ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले.

या गोंधळासंदर्भात आ. लंके यांनी लसीकरणाच्या संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. टोकन वाटप संदर्भातील यादीची तपासणी केली असता त्यात अनेक आक्षेपार्ह नावे आढळून आली. त्यानंतर आ. लंके यांनी वैदयकिय अधिकारी मनिषा उंद्रे यांच्याकडून लेखी निवेदन घेतले.

यापुढे लसीकरणात गोंधळ होणार नाही, असे सांगून डॉ. उंद्रे यांनी माफी मागितली. त्यानंतर हा विषय तिथेच संपला. त्यानंतर आमदार लंके तेथून निघून गेले. यावेळी आमदार लंके यांनी कुणालाही शिविगाळ केली नाही, किंवा मारहाण केलेली नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe