नवी दिल्ली : आयुर्विम्याच्या नियमांमध्ये १ डिसेंबरपासून मोठे बदल होणार आहेत. इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ॲथॉरिटी ऑफ इंडिया (इरडा) ही नवीन नियम लागू करणार आहे.
नव्या नियमांनुसार विम्याचा हप्ता वाढण्याची शक्यता आहे, तर गॅरेंटीड रिटर्न काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. आयडीबीआय फेडरल लाईफ इन्शुरन्सचे सीएमओ कार्तिक रमन यांनी सांगितले की, जरी हप्ता वाढला तरीही ग्राहकांना जास्त सुविधा मिळणार आहेत.
तर फिनसेफ इंडियाच्या मृण अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार पेन्शन प्लानला ग्राहकाभिमुख बनवले जाणार आहे. मॅच्युरिटी किंवा त्याआधी रक्कम काढण्याबाबतचे नियम सोपे होणार आहेत. मॅच्युरिटीची रक्कम काढण्याचे बंधन ३३ टक्क्यांवरून ६० टक्के केले जाणार आहे.
युलिप ग्राहकांसाठी मिनिमम लाईफ कव्हर कमी होणार आहे. सध्या एका वर्षाच्या हप्त्याच्या १० पट होते ते घटवून सात पट केले जाणार आहे. यामुळे रिटर्न जास्त मिळणार आहे. एंडोव्हमेंट प्लान जो कमीत कमी १० वर्षांसाठी असेल, त्यासाठी सरेंडर व्हॅल्यू ३ वर्षांवरून दोन वर्षे करण्यात येणार आहे.