मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या नावे तीन विक्रमांची नोंद झाली आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यानंतर सलग पाच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाल पूर्ण करणारे देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत.
याचबरोबर सगळ्यात अल्पकाळ टिकलेल्या सरकारचे मुख्यमंत्री राहण्याचादेखील विक्रम त्यांच्या नावे नोंदवला गेला आहे. १९६३ मध्ये मारोतराव कन्नमवार यांच्या निधनानंतर पी. के. सावंत यांच्याकडे आठ दिवसांसाठी मुख्यमंत्रीपद आले होते.
यानंतर वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाले होते. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी हा आठ दिवसांचा विक्रम देखील मोडीत काढला. अवघ्या तीन दिवसांत त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलेला आहे.
याशिवाय एकाच व्यक्तीने महिनाभराच्या आत दोनदा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचाही विक्रम फडणवीस यांच्या नावावर नोंदवला गेला आहे.