कुटुंबीय अंत्यविधीसाठी बाहेरगावी गेले; चोरटयांनी डाव साधत घर लुटले

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यात चोरटयांनी धुमाकूळ घातला आहे. गुन्हेगारीमधील वाढ पाहता नागरिक दहशतीखाली वावरू लागले आहे अन दुसरीकडे मात्र चोरटे खुलेआम फिरू लागले आहे.

नुकतेच राहुरी फॅक्टरी भागातील दत्तनगरला मध्यरात्री चार ते पाच अज्ञात चोरट्यांनी बाहेरगावी अंत्यविधीसाठी गेलेल्या व मोलमजुरी करणार्‍या श्रावण पोपट भालेराव यांच्या घराचे कुलूप तोडून घरात उचकापाचक करून 20 हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली.

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्याचे दिसून येत आहे. राहुरी फॅक्टरी येथील दत्तनगर येथे चैतन्य मिल्कचे अध्यक्ष गणेश भांड यांच्या संपर्क कार्यालयाचे कडी कोयंडा तोडून सामानाची उचकापाचक केली.

त्यानंतर बराचवेळ चोरटे संपर्क कार्यालयाच्या बाहेरील झाडाझुडपात लपून बसले होते. कार्यालय परिसरात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये अज्ञात चार ते पाच चोरटे कैद झाले आहेत. राहुरी पोलीस ठाण्यात भालेराव यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चार ते पाच चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe