अहमदनगर Live24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :- अर्बन बँक म्हणजे संबंध जिल्ह्यासाठी चर्चेचा विषय ठरते आहे. कर्जप्रकरण असो व गडबड घोटाळा या बँकेची प्रतिमा दिवसेंदिवस मलीन होऊ लागली आहे. नुकतेच बनावट सोने प्रकरणावरून बँक चांगलीच अडचणीत सापडली आहे.
नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या शेवगाव येथील बनावट सोने प्रकरणाचा तपास नगरच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागकडे वर्ग केल्यानंतर सोमवारपासून या घटनेचा तपास व चौकशी सुरू होणार आहे.
दरम्यान, या प्रकरणात संदर्भामध्ये बँकेकडून अन्य काही कागदपत्रे सुद्धा पोलिसांना हस्तगत करायचे आहेत. नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या शेवगाव शाखेमध्ये गेल्या दोन वर्षापासून बनावट सोने प्रकरणाचा विषय गाजला होता.
मागील आठवड्यामध्ये या प्रकरणा संदर्भमध्ये शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 160 जनांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
367 पिशव्या या बनावट आढळून आल्यानंतर मागील आठवड्यामध्ये शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. 160 आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
साधारणता यांची रक्कम पाच कोटी रुपयांच्या घरांमध्ये असल्यामुळे सदरचा गुन्हा नगरच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आलेला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम