अहमदनगर Live24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :- रेखा जरे हत्या प्रकरणात अटकेत असलेला मुख्य आरोपी बाळ जगन्नाथ बोठे यांच्या पत्नी सविता बाळ बोठे यांनी माझ्या व मुलांविरोधात सध्या जाणीवपूर्वक खोटी निवेदने, तक्रार अर्ज केले जात असून ऍड. पटेकर यांनी बोठे
यांचे नातेवाईक पाळत ठेवत असल्याचे सांगत पोलीस सरंक्षण मागणी साठी केलेल्या खोट्या निवेदनाची चौकशी व्हावी अशी मागणी जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनाची प्रत सौ.बोठे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवली आहे. निवेदनात सविता बोठे यांनी सध्या सुपा पोलीस ठाण्यात दाखल पती बाळ बोठे आरोपी असल्याने न्यायालयाच्या कामकाजासाठी आपण स्वतः, मुलगा आणि दिर कार्यरत आहोत. आम्हाला सध्या इतर कोणीही मदत करत नाहीत.
आमच्यावर ओढवलेल्या प्रसंगाने नातेवाईक, हितचिंतक, मित्र उरले नाहीत. आम्हाला इतर कोणीही मदत करत नाहीत. अशा परस्थितीत ऍड. पटेकर यांनी दिलेल्या निवेदनात बाळ बोठे यांच्या पत्नीने कुठलेही कारण नसताना माझ्या विरोधात तक्रार केली आहे. ऍड.पटेकर यांनी संरक्षण मिळावे म्हणून खोटे निवेदन दिलेले आहे.
यापूर्वीही त्यांनी अशी मागणी करत खोटे निवेदने दिली आहेत. गेल्या सात-आठ महिन्यापासून आमच्या विरोधात कसलेही निवदणे नव्हती, मात्र बेल साठी अर्ज दाखल करताच आमच्या विरोधात खोटी निवेदने देऊन आमचे मानसिक खच्चीकरण केले जात आहे.
यामागे कोर्ट कामकाजात विघ्न आणण्याचा प्रयत्न केले जात आहे, असे सौ.बोठे यांनी निवेदनात म्हंटले आहे. आपण स्वतः वकील असून कायद्याचा सन्मान करणाऱ्या आहोत. पोलिसांना आम्ही सर्व सहकार्य केले आहे. मात्र खोटी निवेदने देऊन आम्हाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
तरी याची योग्य प्रकारे खातरजमा करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी सविता बोठे यांनी केली आहे. खोटे निवेदने देणाऱयांवर कारवाई केल्याने चाप बसेल. आपण वकील असून कायदा कधीही हातात घेणार नाही. आमचा न्याय-व्यवस्थेवर विश्वास आहे. उलट या गोष्टींमुळे आमच्या कुटुंबास त्रास होत असून आम्हाला सरंक्षण अपेक्षित आहे.
त्याबाबत विचार व्हावा अशी मागणी सौ.बोठे यांनी केली आहे. आपण खरे बोलत असल्याने आपली आणि खोटे निवेदने देणाऱ्यांची नार्को टेस्ट करावी आणि जे सत्य येईल त्यानुसार कायदेशीर कारवाई करावी जेणेकरून अशा प्रकारांना चाप बसेल असेही त्यांनी निवेदनात म्हंटले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम