अहमदनगर Live24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :- कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी कडक निर्बंध लावलेले असताना अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता अनेक दुकान विहित वेळेबाह्य सुरु असलेली दिसून आली.
दुकानात बंद शटरआड सुरू असलेल्या व्यवहारावर प्रशासनाने गदा आणली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर प्रशासनाने कारवाई केली आहे.
दुपारी 4 नंतर बंद ठेवण्याचा आदेश असतानाही ती सुरु ठेवल्याने नेवासा व नेवासाफाटा येथील 12 दुकानदारांवर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर शुक्रवारी नेवासा शहर हद्दीतील 7 दुकानदारांवर नेवासा नगरपंचायत, तहसील कार्यालय व पोलीस ठाणे यांनी संयुक्त कारवाई करत दुकाने सील केली.
दरम्यान व्यावसायिकांनी करोना नियमांचे, वेळेचे पालन करावे असे आवाहन तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी केले आहे. 3 ऑगस्ट रोजी आषाढी एकादशीनिमित्त दुकाने चार नंतर दुकाने बंद करावेत असे निर्देश असतानाही दुकाने सुरु ठेवली म्हणून नेवासा फाटा व नेवासा शहर हद्दीतील 12 दुकानदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तर शुक्रवारी या 12 व्यावसायिकांपैकी नेवासा नगरपंचायत हद्दीतील मनोज अंबादास पारखे, अलताफ अरुण पिंजारी, जिजाबापू लक्ष्मण जाधव, महेश कैलास वाखुरे, ताराचंद परसराम परदेशी, रेणुका संतोष डांगरे व गोरख लहानू घुले या 7 जणांच्या व्यापारी आस्थापनांना (दुकाने) तहसीलदार, नगरपंचायत मुख्याधिकारी, पोलीस निरीक्षक यांच्यावतीने संयुक्त कारवाई करत सील लावण्यात आले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम