परत धूम स्टाईल गंठणचोर सक्रिय…?

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :- घरी पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील गंठण पाठीमागून भरधाव वेगात दुचाकीवर आलेल्या दोघांनी धूमस्टाईलने ओढून तोडून नेल्याची घटना सावेडी उपनगरातील गुलमोहर रोडवर घडली.

याबाबत शोभा भास्कर झावरे यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुपारचा सुमारास घराकडे पायी जात असताना गुलमोहर रोडवर जागृती कॉलनी येथील घराच्या गेटजवळ आले असता,

पाठीमागून भरधाव वेगात दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी आपल्या गळ्यातील ९० हजार रुपये किमतीचे पावणेतीन तोळे वजनाचे गंठण बळजबरीने ओढून तोडून अज्ञात इसम दुचाकीवर भरधाव वेगात पसार झाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe