श्रीरामपूर पालिकेची कोरोनात वीस हजार कुटुंबांना मदत’

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :- वडील स्व. गोविंदराव आदिक यांचे विचार व प्रेरणा घेऊन अनुराधा आदिक नगर परिषदेचा कारभार पारदर्शी व काटेकोरपणे हाकत आहेत.

कोरोना काळात शहरातील २० हजार सर्वसामान्य कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप केले. नगर परिषदेमार्फत कोविड केअर सेंटर सुरू केले. या सेंटरसाठी १ लाख रुपयांची मदत केली, असे प्रतिपादन मान्यवरांनी केले. यशंवतराव चव्हाण सभागृहात नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांच्यावर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.

यावेळी नगरसेवक राजेंद्र पवार, प्रकाश ढोकणे, रईस जहागिरदार, कलिम कुरेशी, अलतमश पटेल, दिपक चरण चव्हाण, नगरसेविका जयश्री शेळके, कैलास बोर्डे, अर्चना पानसरे, जया जगताप, विजय शेळके, विजय डावखरे, रोहित शिंदे आदि उपस्थित होते. महाराष्ट्र कृषक समाज संघटनेच्या माध्यमातून अनेक आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून दिली.

आदिक यांनी घर तेथे रस्ता ही संकल्पना घेऊन शहरातील जवळपास सर्वच रस्त्यांची कामे मार्गी लावली. छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी आपल्या मानधनातून १ लाख रुपये दिले. पालिकेच्या कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग देणारी श्रीरामपूर ही पहिली नगरपरिषद आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News