अकोले :- आईचा विरह सहन न झाल्याने शनिमंदिर परिसरातील बांगड्यांचे व्यावसायिक विश्वनाथ पुरुषोत्तम शेटे यांचे बुधवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या मातु:श्री सीताबाईंचे रविवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यामुळे विश्वनाथ दुःखी होते.
बुधवारी पहाटे चारच्या सुमारास त्यांना त्रास जाणवू लागला. काही वेळातच त्यांनी प्राण सोडला. त्यांच्यावर संगमनेर येथील प्रवरातीरी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, २ बहिणी असा परिवार आहे.